जिल्हा
हळदीच्या दिवशीच उमेदवारीचे बाशिंग
हळदीच्या दिवशीच उमेदवारीचे बाशिंग
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथला पहिला उमेदवारी अर्ज सादर
अंबरनाथ: घरी लग्नाची लगबग, उद्या लग्नाचा मुहूर्त पण त्याआधी आकाश पुजारी यांनी नगरपालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
आकाश पुजारी यांनी वांद्रे पाडा प्रभाग क्र १० ब मधून आज अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. अंबरनाथ नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत पुजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. आकाश पुजारी यांचा उद्या १४ नोव्हेंबर रोजी चिंचपाडा येथे सकाळी ११ वाजता विवाह होणार आहे. मात्र त्यांनी हळदीच्या दिवशीच १३ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबियांसह अंबरनाथ नगरपालिका मुख्यालय गाठून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर आज प्रथमच पुजारी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600