जिल्हा
पाहिल्याच पावसात बेलापूर पाण्याने भरले
पाहिल्याच पावसात बेलापूर पाण्याने भरले
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबईत रात्रभर जोरदार पावसामुळे शहराला अक्षरशः झोडपून काढले असून शहरातील सखल भागात जागोजागी पाणी साचले आहे. याचा सर्वाधिक फटका सीबीडी बेलापुर भागाला बसला असून सारा परिसर जलमय झाला आहे. बेलापूरमध्ये १३३ मि.मी. तर नेरूळमध्ये १५५ मि.मी. पाऊस पडला.
रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी झालेल्या धुवांधार पावसामुळे नवी मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. नवी मुंबईत रात्रभर विजेच्या कडकटासह पावसाने दमदार हजेरी लावत नवी मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले.
शहरात ठीकठिकाणी झाडे उन्मळून पडली. सीबीडी बस स्थानकात गुडघाभर पाणी भरल्याने बस डेपोला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. हीच परिस्थिती बेलापूर मेट्रो स्टेशनखाली व बेलापूर कार्यालयासमोर होती. या ठिकाणी देखील पाणी भरल्याने चारचाकी वाहने पाण्यात तरंगताना दिसत होती.
सीबीडी बेलापूर सेक्टर ८ येथे एका इमारतीचे पुनर्विकासाचे काम सुरू असून त्यासाठी खोदकाम केले आहे. मात्र हे खोदकाम करत असताना विकासकाने आवश्यक काळजी न घेतल्याने येथील खोदकामात पाणी भरल्याने येथिल मातीचा मोठा भाग खचला. यात येथील तीन झाडे देखील पडली आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600