जिल्हा

जाहिरात फलक दुर्घटना : स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा

जाहिरात फलक दुर्घटना : स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा
जाहिरात फलक दुर्घटना : स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा फोटो: ठाणे वैभव
ठाणे : वर्तक नगर प्रभाग समिती क्षेत्रातील ओसवाल पार्क, सुभाष नगर परिसरात 6 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7च्या सुमारास रस्ता दुभाजकामध्ये उभारण्यात आलेला कॅन्टिलिव्हर प्रकारचा अधिकृत जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली. या घटनेची ठाणे महानगरपालिकेने गंभीर दखल घेत संबंधित जाहिरात फलकाची परवानगी तत्काळ रद्द केली असून जाहिरात संस्था आणि संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या चौक सुशोभीकरण योजनेअंतर्गत विविध चौकांच्या सुशोभीकरणाच्या मोबदल्यात संबंधित संस्थेला हा जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, संबंधित संस्थेने जाहिरात फलकाचे अद्ययावत स्ट्रक्चरल ऑडिट करून 6 जून 2026 रोजी सक्षम संरचनात्मक अभियंत्याकडून जारी करण्यात आलेले 'स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट' महापालिकेकडे सादर केले होते, असे प्रमाणपत्र अस्तित्वात असतानाही हा फलक कोसळल्याने महापालिकेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तीय नुकसान झाले नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने तातडीने कठोर पावले उचलली आहेत. या घटनेनंतर संबंधित जाहिरात फलकाची परवानगी तत्काळ रद्द करण्यात आली. तसेच संबंधित संस्था आणि संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्याविरुद्ध चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600