जिल्हा

भिवंडीत मध्यरात्री कँडल मार्च

भिवंडीत मध्यरात्री कँडल मार्च
भिवंडीत मध्यरात्री कँडल मार्च फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भिवंडीत शनिवारी रात्री १२ वाजता कोटरगेट येथील आनंद दिघे चौक ते आंबेडकरनगरपर्यंत ठाणे जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसतर्फे कँडल मार्चचे आयोजन केले होते.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करीत या ठिकाणी आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी भूमिका कँडल मार्चचे आयोजक ठाणे जिल्हा ग्रामीण कॉंग्रेसचे सरचिटणीस पंकज गायकवाड यांनी मांडली. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते सामील झाले होते. तसेच भिवंडी फाउंडेशनचे आरफात खरबे, युवा नेते जोया शेख, आयान अन्सारी, एमआयएमचे स्थानिक प्रवक्ते रविश मोमीन, प्रतापगडी सेवा दलचे इश्तियाक मोमीन, भिवंडी वकील संघटनेचे माजी सचिव ऍड.रवी सोनवणे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600