जिल्हा

वाहतूक पोलिसाला कार चालकाची मारहाण

वाहतूक पोलिसाला कार चालकाची मारहाण
वाहतूक पोलिसाला कार चालकाची मारहाण फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : कल्याण शिळफाटा या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर मानपाडा चौक भागात मुख्य रस्त्यावर नियमबाह्यपणे फॉर्च्युनर कार उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याबाबत जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला कार चालकाने बेदम मारहाण केली. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे हवालदार उमेश जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डोंबिवलीतील फॉर्च्युनर वाहनाचा चालक, मालक यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौक भागात घडली. हवालदार जाधव यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शिळफाटा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी वाहतूक विभागाचे हवालदार बच्छाव, मुंढे, वाहतूक सेवक अमोल हुबाळे, सुभाष पाडाळे आम्ही वाहतूक नियोजनाचे काम करत होते. दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान वाहतूक सेवक वाहतूक चौकीत भोजनासाठी गेले. त्यावेळी आपण मानपाडा चौक, पेट्रोल पंप, विद्यानिकेतन छेद रस्त्याच्या भागात वाहतूक नियोजनाचे काम करत होतो. यावेळी कल्याणकडून शिळफाटा दिशेने जाणारी वाहतूक मंदावून शिळफाटा दिशेच्या मार्गिकेवर वाहन कोंडी होऊ लागली म्हणून आपण मानपाडा चौक ते उंबार्ली विद्यानिकेतन शाळा छेद रस्त्यावरील मुख्य रस्त्यावर उभी असलेली वाहने चालकांना हटविण्यास सुरूवात केली. शिळफाटा मुख्य रस्त्यावर एक फॉर्च्युनर कार उभी आहे. त्यामुळे कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यावर हवालदार शिंदे यांनी त्या वाहनाच्या चालकाजवळ जाऊन आपले वाहन बाजुला घ्या. वाहन कोंडी होत आहे, असे सांगितले. त्यावेळी चालकाने वाहनातून बाहेर येऊन मी गाडी बाजुला घेणार नाही असे बोलत ते वाहनातून खाली उतरून आपणास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यांनी आपण केलेल्या सूचनेचा गैरअर्थ काढून आपणास ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600