जिल्हा

ठाण्यात १५ वर्षांनी होणार जनगणना

१ ते १५ मे कालावधीत ५७०० प्रगणक जाणार घरोघरी ठाणे : तब्बल १५ वर्षानंतर ठाण्याची जनगणना केली जाणार आहे. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी ठाण्यात या जनगणनेला सुरुवात होणार आहे. पहिला टप्प्यात शहरातील घरे, इमारती आणि कुटुंबांची सविस्तर मोजणी करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रभाग समितीनिहाय प्रगणक गट तयार करण्यात येणार असून ५७०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. ठाणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १८ लाख ४१,४८८ इतकी होती. त्यामध्ये पुरुष नऊ लाख ७५,३९९ आणि महिलांची संख्या आठ लाख ६६,०८९ इतकी नोंदविण्यात आली होती. यंदाची जनगणना अधिक व्यापक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या जनगणनेसाठी मनपा क्षेत्रात ५,७०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार असून, प्रत्येक सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार आहे. जणगणनेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील घरे, इमारती आणि कुटुंबांची सविस्तर नोंद केली जाणार आहे. हा टप्पा १ ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार असून, घरयादी तयार केली जाणार आहे. प्रत्येक प्रगणकाला सुमारे १८० ते २०० घरांची मोजणी करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. दुसरा टप्पा १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान होणार असून, यामध्ये नागरिकांची वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिजिटल पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती श्री. रोडे यांनी दिली आहे. यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमार्फत उपलब्ध असलेली जन्म-मृत्यू नोंद, कुटुंब नोंदणी, लसीकरणासंबंधीचा डेटा संकलित करून त्याची छाननी सुरू आहे. या पूर्वीच्या माहितीच्या आधारावरून प्रत्यक्ष सर्वेक्षण अधिक अचूक होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख ४१,४८८ इतकी होती. मागिल काही वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने यंदाची जणगणना अधिक व्यापक स्वरूपात केली जाणार आहे. जणगणना पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत १ मार्च २०२७ असा दिनांक निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी जणगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600