जिल्हा

मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून मिळाले ४५९.५२ कोटी

मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून मिळाले ४५९.५२ कोटी
मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून मिळाले ४५९.५२ कोटी फोटो: ठाणे वैभव
मुंबई: मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भंगार विक्रीतून तब्बल ४५९.५२ कोटी रुपयांचा महसूल मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ही आकडेवारी गेल्या दोन वर्षांतील सर्वोत्तम ठरली असून, रेल्वे बोर्डाने निश्चित केलेले ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्टही मध्य रेल्वेने ओलांडले आहे. झिरो स्क्रॅप स्टेटस साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले, हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मध्य रेल्वेने टाकाऊ आणि अनुपयोगी साहित्याचे महसूलक्षम मालमत्तेत रूपांतर करण्यावर विशेष भर दिला आहे. त्यानुसार, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन यांचा समन्वय साधत विशेष मोहिम राबवून विविध प्रकारच्या भंगार साहित्याची मोठ्या प्रमाणावर विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये ४७,५०२ मेट्रिक टन रेल्वे रूळाचे भंगार, ३१,२९८ मेट्रिक टन लोह-धातू भंगार, ३,६१६ मेट्रिक टन लोह व्यतिरिक्त धातू भंगार तसेच २,६५,६२५ स्लीपर्सचा समावेश आहे. याशिवाय ५० लोकोमोटिव्ह्ज, ७८ डबे आणि १३७ वॅगन्स, या रोलिंग स्टॉकचीही यशस्वी विल्हेवाट लावण्यात आली. ही कामगिरी साध्य करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भांडार विभागाने व्यापक आणि सुसूत्र मोहिमा राबवल्या. कुर्ला कटिंग यार्ड, नाशिक येथील ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप, परळ वर्कशॉप तसेच मनमाड वर्कशॉप यांसारख्या विविध ठिकाणी पडून असलेले भंगार बारकाईने शोधण्यात आले. मध्य रेल्वेच्या सर्व पाचही विभागांमधील केंद्रीय प्रयत्नांमुळे भंगार विक्रीत लक्षणीय वाढ झाली. मध्य रेल्वेच्या विभागनिहाय कामगिरीत भुसावळ विभागाने आघाडी घेत सर्वाधिक सुमारे १०५.३९ कोटी रुपयांची विक्रमी भंगार विक्री केली. त्या पाठोपाठ माटुंगा कार्यशाळा (६८.३९ कोटी), नागपूर विभाग (६४.०२ कोटी), मुंबई विभाग (५५.४९ कोटी) आणि पुणे विभागाने ५० कोटी रुपयांची कामगिरी नोंदवली. उर्वरित महसूल इतर विभाग आणि उत्पादन घटकांकडून प्राप्त झाला. याशिवाय, मध्य रेल्वेने वापरात नसलेल्या पण कार्यक्षम संसाधनांचा पुनर्वापर करण्यावरही भर दिला. याचाच एक भाग म्हणून वापरात नसलेले रोटाटेक प्रिंटिंग मशीन भंगारात टाकण्याऐवजी ८.७५ कोटी रुपयांच्या मूल्याने नाशिक प्रिंटिंग प्रेसकडे हस्तांतरित करण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600