जिल्हा

सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

कल्याण : एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकल्याच्या भीतीने सहाव्या मजल्यावरून उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच चालत्या लिप्टमधून तोल जाऊन थेट लिप्टच्या खड्ड्यात पडून १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील गांधारे गावात असलेल्या रिध्दी सिध्दी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हिमांशु कनोजिया (१३) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मृतक हिमांशु यांच्या वडिलांचे गांधारे गावात असलेल्या रिध्दी सिध्दी सोसायटीजवळच लाॅन्ड्रीचे दुकान आहे. मृत हिमांशु आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करून तो परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांचे कपडे इस्त्रीसाठी आणून त्यांना पुन्हा देत असे. अशाच प्रकारे बुधवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास रिध्दी सिध्दी सोसायटीच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचे इस्त्री केलेले कपडे लिप्टमधून घेऊन गेला होता. त्यानंतर कपडे देऊन पुन्हा तो खाली जाण्यासाठी लिप्टमध्ये आला. तेव्हाच लिप्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन लिप्ट पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या मध्ये अचानक थांबली होती. त्यामुळे लिफ्टमध्ये अडकून राहू या भीतीने लिफ्टचा दरवाजा हिमांशुने उघडताच लिफ्ट सुरु झाली आणि त्याच सुमारास त्याचा लिफ्टमधून तोल जाऊन तो सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्ड्यात पडून जागीच मृत्यू पावला. दुसरीकडे सायंकाळी ग्राहकांच्या घरी इस्त्रीचे कपडे घेऊन गेलेला हिमांशू बराच वेळा झाला तरीही लाॅन्ड्रीच्या दुकानात परत आला नव्हता. त्यामुळे त्याचे वडील आणि नातेवाईकानी त्याची शोधाशोध सुरू केली होती. दरम्यान रात्रीच्या सुमारास रिध्दी सिध्दी सोसायटीच्या इमारतीमधील लिफ्टच्या खड्ड्यात मुलगा पडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वडील आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन लिफ्टच्या खड्ड्यात हिमांशूला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथे डाॅक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मृत घोषित केल्याने कनोजिया कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेमुळे सोसायटीतील रहिवासी हळहळ व्यक्त करीत होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600