जिल्हा
ठाण्यातील अपक्षांची पसंती; फुगा, बिस्कीट, सीसीटीव्ही...
ठाणे: निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांपुढे एकूण १९४ निवडणूक चिन्हांचा पर्याय ठेवला होता. त्यापैकी बहुतेक उमेदवारांनी फुगा, नारळ, सीसीटीव्ही, बिस्कीट, सफरचंद, सूर्यफुल या चिन्हांना विशेष पसंती दिली.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने तीन चिन्हांचे पर्याय उमेदवारी अर्जात दिले होते. ही सर्व चिन्हे त्यांना १९४ चिन्हांच्या यादीतून निवडायची होती. उमेदवाराने प्रथम निवडलेले चिन्ह जर दुसर्या उमेदवाराने यापूर्वीच घेतले असेल अशा उमेदवारांना त्यांनी मागणी केलेले दुसर्या क्रमांकाचे चिन्ह देण्यात आले. या चिन्हांमध्ये उमेदवारांनी सर्वाधिक पसंती नेहमीच वापरात असलेल्या वस्तूंना दिली. बहुतेक उमेदवारांनी गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, पेनाची नीब, सूर्यफूल, बॅग, सुटकेस आदी चिन्हांना पसंती दिल्याने त्यांना निवडणुकीसाठी हीच चिन्हे देण्यात आली आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून आज अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम सर्वच निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात पार पडला. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनाही निवडणूक चिन्हे मिळाल्यामुळे प्रचाराचा खर्या अर्थाने धूमधडाका सुरू झाला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600