जिल्हा

मेघालयातील कोळसा खाणीत स्फोट, १६ जणांचा मृत्यू

मेघालयातील कोळसा खाणीत स्फोट, १६ जणांचा मृत्यू
मेघालयातील कोळसा खाणीत स्फोट, १६ जणांचा मृत्यू फोटो: ठाणे वैभव
शिलाँग: मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका बेकायदेशीर कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. डायनामाइट फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनास्थळी पोहचले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यही सुरु करण्यात आलं आहे. पोलिसांनी आणि राज्य मदत पुनर्वसन पथकाकडे मदत मागितली आहे. पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितलं की ही घटना थांगस्कू भागात झाली आहे. आत्तापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एक व्यक्ती ७० टक्के भाजला आहे, त्याला आम्ही उपचारांसाठी शिलाँगला पाठवलं आहे. बचाव पथकाचं कार्य या ठिकाणी सुरु आहे. दरम्यान खाणीत नेमके किती लोक अडकले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेत जे लोक जखमी झाले आहेत त्यांना आम्ही आरोग्य केंद्रात घेऊन जात आहोत. ज्यांना जास्त उपचारांची गरज आहे त्यांना शिलाँगला पाठवण्यात येत आहे. विकास कुमार म्हणाले की आम्ही एसडीआरएफची मदतही मागितली आहे. लवकरच बचावकार्यात ते सहभागी होतील असंही त्यांनी सांगितलं. ज्या खाणीत स्फोट झाला ती बेकायदेशीर होती. डायनामाईटचा स्फोट नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. आम्ही याबाबत पुढे तपास करत आहोत असंही विकास यांनी माध्यमांना सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कोळसा खाणीत स्फोट झाला ती खाण बेकायदेशीर होती. या ठिकाणी डायनामाईटचा उपयोग झाला. स्फोटाचं कारण कळलेलं नाही. रॅट होल खाण कामात कोळसा खाणीत काम करणाऱ्या १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. खरंतर अशा पद्धतीने खाण काम करणं यावर बंदी घालण्यात आली आहे तरीही या पद्धतीने खाणकाम करण्यात येत होतं असंही पोलिसांनी सांगितलं

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600