जिल्हा

कोस्टल रोड प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर

कोस्टल रोड प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर
कोस्टल रोड प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांच्या मुळावर फोटो: ठाणे वैभव
काम बंद पाडण्याचा रवी घरत यांचा इशारा ठाणे: ठाण्याची वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी ठाण्यात राज्य शासनाच्या वतीने कोस्टल रोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन होणार असेल, स्थानिकांचा रोजगार बंद होणार असेल तर हे काम बंद पाडू, असा इशारा शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी दिला आहे. या प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी श्री.घरत यांनी शेतकऱ्यांसमवेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकल्पात परप्रांतीयाना रोजगार मिळाला मात्र ज्यांनी जमिनी कसल्या त्या शेतकऱ्यांना मात्र रोजगार मिळालेला नसून शेतकऱ्यांना मोबदला आणि रोजगार न मिळाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा घरत यांनी दिला आहे. यासंदर्भात ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाघबीळ गावात स्व. आनंद दिघे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या वृद्धाश्रमाला महापालिकेने कारवाईची नोटीस दिली आहे. मात्र त्याच परिसरात एका नामांकित बिल्डरचा बंगला अनधिकृत बांधकाम असल्याची चर्चा असतानाही त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600