जिल्हा

अंबरनाथ नगरपालिकेत समिती सभापती निवडणुका बिनविरोध

अंबरनाथ नगरपालिकेत समिती सभापती निवडणुका बिनविरोध
अंबरनाथ नगरपालिकेत समिती सभापती निवडणुका बिनविरोध फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ : अखेर सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अंबरनाथ नगरपालिकेत विषय समिती सभापती निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून भाजपला साथ करणाऱ्या काँग्रेसच्या पदरात एकही समिती आली नाही. शिवसेनेला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन समित्या आल्या आहेत. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, महिला बाल कल्याण, नियोजन समिती अशा सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी शैलेश भोईर (शिवसेना), शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक समिती सभापतीपदी रेश्मा गुडेकर, आरोग्य समिती सभापतीपदी सदाशिव पाटील, उप नगराध्यक्ष (राष्ट्रवादी ), पाणी पुरवठा समिती सभापतीपदी सुनीता पाटील (राष्ट्रवादी), नियोजन समिती सभापतीपदी महेश फुलोरे (भाजपा), महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी स्वाती पाटील ( भाजपा) तर उप सभापतीपदी किरण चौबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले, तसेच भाजपतर्फे अनिता भोईर आणि पवन वाळेकर यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड झाली. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. शिवसेना सदस्यांमध्ये नाराजीचा सूर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली असली तरी अनेक नगरसेवक या निवडीवरून नाराज असल्याचे दिसून आले. काल रात्रीपर्यंत ज्या सदस्यांचे नाव सभापतीपदाच्या शर्यतीत होते त्यांचे नाव आज )सकाळी यादीतून गायब झाल्याने काहीशी नाराजी दिसून आली. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी समितीचे सदस्य पद नाकारण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी समितीमध्ये त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर लागलीच आक्षेप नोंदवत या समितीतून नाव काढा, समितीमध्ये राहण्याची इच्छा नाही असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्या पाठोपाठ नगरसेवक संदीप तेलंगे यांनी देखील अशाच पद्धतीने नाराजी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600