जिल्हा

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ठाणे भाजपकडून पोलिसांकडे तक्रार

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ठाणे भाजपकडून पोलिसांकडे तक्रार
राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ठाणे भाजपकडून पोलिसांकडे तक्रार फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या दोघा नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. महापालिका मुख्यालयापासून पोलिस ठाण्यात पायी जात नगरसेवकांनी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी आणि ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. महापालिकेच्या महासभेत महापौरांबरोबर चर्चा करण्यासाठी उपमहापौरांसह भाजपचे नगरसेवक डायसवर गेले होते. मात्र, त्याला महापौरांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी नाईलाजास्तव ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे व राजेश मोरे यांनी सभागृहाला कुठलीही पूर्वसूचना न देता राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. सभागृहाच्या नियमानुसार राष्ट्रगीतासंबंधी सूचना केवळ सचिव देऊ शकतात. मात्र, या दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रगीत म्हणून बेकायदेशीररित्या सभा संपवली. त्यातून राष्ट्रगीताबरोबरच सर्व पीठासीन अधिकारी व सभागृहाचा अवमान झाला आहे. त्यामुळे या दोन्ही नगरसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपमहापौर कृष्णा पाटील, मुकेश मोकाशी, संजय वाघुले यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली. नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांनी तक्रार स्विकारली. महासभेच्या कामकाजाचे व्हिडिओ चित्रण होत नाही. त्यामुळे या सभेचे व्हिडीओ चित्रण करावे, अशी सूचना महापालिकेला द्यावी, अशी मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली. त्यावेळी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600