महाराष्ट्र

विरोधातील मतदान टाळण्यासाठी केंद्रांत जाणीपूर्वक दिरंगाई

उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल मुंबई: ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडत आहे, त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला गेला, मतदारांना मुद्दाम ताटकळत ठेवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी मतदारांना हे आवाहन केले. मतदारांमध्ये उत्साह मोठा असून निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचे आवाहन केले गेले. मात्र अशातच निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत असून पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला गेला. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बूजून वेळ केला जात आहे, असा आरोप श्री.ठाकरे यांनी केला. ज्या मतदान केंद्रावर आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणाचा अनुभव आला असेल त्या ठिकाणच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचे नाव विचारावे, नोंद करावे. अशांची माहिती गोळा करून आम्ही कोर्टात जाऊ, असेही त्यांनी सांगितले. मोदी सरकार पराभवाच्या भितीने पछाडलेले आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते म्हणाले की, मतदानासाठी गेलेल्या अनेकांची नावे यादीमधून वगळली जाणे हा सरकारचा आवडता खेळ आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600