आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, महापालिकेचे माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कामाचे भूमिपूजन स्वतः न करता तेथे उपस्थित असलेले विलास जोशी यांना भूमिपूजन करण्याचा मान दिला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दादोजी कोंडदेव स्टेडियम येथिल खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा, पूर्व ठाण्यातील शेठ लक्ष्मीचंद फतिचंद प्रसूतीगृहाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन, कन्हैय्या नगर येथिल उद्यानाचे तसेच एसटीपी प्लांटचे भूमिपूजन देखिल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली असून विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका पुढील काही महिने असाच सुरु राहणार असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
जिल्हा
धर्मवीर आनंद दिघे टॉवर पुन्हा दिमाखात उभा राहणार!

फोटो: ठाणे वैभव
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात विविध कामांचे भूमिपूजन
ठाणे: अखेर जांभळी नाका येथिल स्वर्गीय आनंद दिघे टॉवरच्या पुनर्बांधणीच्या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या टॉवरचे काम उत्तम दर्जाचे करण्याची सूचना यावेळी देण्यात आली.
धर्मवीर आनंद दिघे टॉवर जांभळी नाका येथे असून तो २००२ साली उभारण्यात आला होता. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असताना या टॉवरच्या पुनर्बांधणीकरिता निधी मंजूर केला होता, परंतु सुमारे दीड वर्षे या कामाला गती मिळाली नव्हती. 'ठाणेवैभव'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर या कामाला सुरुवात केली होती. या ठिकाणी ध्यान मंदिर, ६५ मिटर उंचीचा घड्याळ टॉवर, सभा मंडप तसेच शिवाजी मैदानाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून या कामाला ११ कोटी इतका निधी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजूर केला आहे.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, महापालिकेचे माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कामाचे भूमिपूजन स्वतः न करता तेथे उपस्थित असलेले विलास जोशी यांना भूमिपूजन करण्याचा मान दिला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दादोजी कोंडदेव स्टेडियम येथिल खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा, पूर्व ठाण्यातील शेठ लक्ष्मीचंद फतिचंद प्रसूतीगृहाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन, कन्हैय्या नगर येथिल उद्यानाचे तसेच एसटीपी प्लांटचे भूमिपूजन देखिल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली असून विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका पुढील काही महिने असाच सुरु राहणार असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ठाणे परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, महापालिकेचे माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कामाचे भूमिपूजन स्वतः न करता तेथे उपस्थित असलेले विलास जोशी यांना भूमिपूजन करण्याचा मान दिला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दादोजी कोंडदेव स्टेडियम येथिल खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा, पूर्व ठाण्यातील शेठ लक्ष्मीचंद फतिचंद प्रसूतीगृहाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन, कन्हैय्या नगर येथिल उद्यानाचे तसेच एसटीपी प्लांटचे भूमिपूजन देखिल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाणे महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली असून विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा धडाका पुढील काही महिने असाच सुरु राहणार असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600