जिल्हा

अपहृत बालिकेची २४ तासांत सुटका

ठाणे: शुल्क करणावरून झालेल्या भांडणात फिर्यादीच्या साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला परिमंडळ ४च्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यप्रदेश येथून अटक केली आहे. रणजित धुर्वे असे आरोपीचे नाव आहे. २४ जून रोजी बदलापूर येथिल रामवाडी भागातून या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा बदलापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस समांतर तपास करत होते. २५ जून रोजी आरोपी रणजित हा मुलीचे अपहरण करुन मध्यप्रदेश येथिल मोरडोंगरी या भागात घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिस मध्यप्रदेश येथिल चिंडवाडा उमराठा पोलिस ठाणे येथे गेले. तेथे त्यांनी मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन अपहरण केलेल्या मुलीची सुटका केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपी हा बदलापूर रामवाडी येथिल बिल्डिंगच्या कामावर मजूर होता. त्याचे शेजारी राहणाऱ्याबरोबर क्षुल्लक वाद झाल्याने त्याने या मुलीचे अपहरण केले, अशी प्राथमिक माहिती असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600