जिल्हा

जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन: ठाणे अकादमीचे खेळाडू चमकले

जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन: ठाणे अकादमीचे खेळाडू चमकले
जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन: ठाणे अकादमीचे खेळाडू चमकले फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे २८ आणि २९ सप्टेंबर २०२५ रोजी ठाणे महानगरपालिका विभागीय व जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या दोन दिवसांच्या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील ३५ पेक्षा अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील तब्बल ७०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. स्पर्धेत सांघिक तसेच वैयक्तिक गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि सर्वच गटांमध्ये प्रेक्षकांना चुरशीचे सामने पाहायला मिळाले. ठाण्यातील नवोदित खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत ठाण्याच्या बॅडमिंटन क्षेत्राला नवे तेज दिले. सांघिक गटात मुलांच्या १९ वर्षाखालील गटात शुभम राजे कनिष्ठ महाविद्यालय या संघाने अजिंक्यपद मिळवले, तर व्ही.पी.एम. जोशी बेडेकर महाविद्यालय उपविजेता ठरले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल विजेता ठरले तर न्यू होरायझन स्कूल, वसंत लॉन्स यांनी रौप्य पदक मिळवले. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात ठाणे पोलीस स्कूलने विजेतेपद पटकावले तर पोददार इंटरनॅशनल स्कूल ने उपविजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात १९ वर्षाखालील वर्गात शुभम राजे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद पटकावले. सुलोचना देवी सिंघानिया स्कूल उपविजेता ठरले, तर सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले, तर सुलोचना देवी सिंघानिया स्कूल उपविजेता आणि सुमतीदेवी सिंघानिया स्कूल तृतीय स्थानी राहिली. १४ वर्षाखालील गटात हिरानंदानी फाउंडेशन स्कूलने सुवर्णपदक मिळवले, डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलने रौप्यपदक तर सुमतीदेवी सिंघानिया स्कूलने कांस्य पदक पटकावले. वैयक्तिक गटांमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा ठाण्याचा झेंडा उंचावला. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात शनाया ठक्कर (डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल) हिने दमदार खेळ करत अजिंक्यपद पटकावले. शनाया ही ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अत्यंत मेहनती खेळाडू असून, राज्य आणि विभागीय यशानंतर तिने शालेय स्तरावरही ठाण्याचे नाव उजळवले आहे. १७ वर्षाखालील मुलींच्या वैयक्तिक गटात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या राधा रावराणे (सावित्रीदेवी थिराणी विद्यालय), आराध्या मोहिते (जे.व्ही.एम.एस. न्यू इंग्लिश स्कूल) आणि अन्वी मोरे (सुमतीदेवी सिंघानिया स्कूल) या तिन्ही खेळाडूंची ठाणे महानगरपालिका (टीएमसी) तर्फे राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर ठाण्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात शारव शहाणे (सुलोचना देवी सिंघानिया स्कूल) याने उपविजेतेपद मिळवले, तर रौनक यादव (सरस्वती विद्यालय, राबोडी) याने तृतीय क्रमांक पटकावला. या दोघांनीही विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ठाण्याचा झेंडा उंचावल्यावर शालेय स्तरावरही आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे १४ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटात अन्नामलाई (सुमतीदेवी सिंघानिया स्कूल) याने अजिंक्यपद पटकावले आणि आपल्या नेमक्या व स्थिर खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विजयी संघात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या अनिका नायर आणि अश्विका नायर या खेळाडूंनीही महत्त्वाची भूमिका बजावली. दोघींच्या उत्कृष्ट सुसंवादामुळे व सातत्यपूर्ण खेळीमुळे संघाने सुवर्णपदक पटकावले. राधा रावराणे, आराध्या मोहिते, अन्वी मोरे, शनाया ठक्कर, शारव शहाणे, रौनक यादव आणि अन्नामलाई या सर्व खेळाडूंनी राज्य आणि विभागीय यशासोबतच शालेय स्तरावरही ठाण्याचे नाव अभिमानाने उजळवले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600