जिल्हा

मनोरुग्णालयात रुग्णांनी बनवल्या दिवाळी वस्तू

पणत्या, उटणे, लोकरीचे तोरण, दिवे, कंदील, पताका लक्षवेधी ठाणे : मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागामार्फत मनोरुग्णांच्या बुध्दीला चालना देत, त्यांच्यातील कौशल्य जाणून ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असून, दिवाळीनिमित्त रुग्णांकडून उटणे, पणत्या, दिवे, कंदील, फुलवाती, लोकरी तोरण, पताके वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. मनोरुग्ण दिसल्यावर हा पुढे काहीच करू शकणार नाही अशी भावना अनेकांची असते. एखाद्या कुटुंबासाठी घरात मनोरुग्ण असणे मोठी अवघड गोष्ट बनून रहाते. मात्र याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात केला जातो आहे. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. परंतु उपचारासोबत रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्नही केला जातो आहे. सणासुदीच्या काळात लागणाऱ्या वस्तू तयार करून, मनोरुग्ण व्यक्तीचे कौशल्य जाणून ते विकसित केलं जाताना दिसत. दिवाळी आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार पद्धतीने मनोरुग्णांकडून विविध दिवाळीच्या वस्तू तयार करून घेतल्या जात असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. हेमांगिनी देशपांडे यांनी दिली. व्यवसाय उपचार पद्धतीने रुग्णांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढीस मोठी मदत मिळते. त्यामुळे वर्षभर रुग्णांना वस्तू तयार करण्याचे शिकवले जाते. जेणेकरून याचा फायदा मनोरुग्णांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतगार ठरू शकेल. दिवाळीत धारावी मधून पणत्या, दिवे आदी वस्तू आणल्या जातात आणि या वस्तूंना आकर्षक रंगाच्या छटा देण्याचे रुग्णाला शिकवले जाते. आतापर्यंत सुमारे १००० पणत्या, २०० उटणे पाकीट, फुलवाती, लोकरी तोरण, कंदील, पताका बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. हेमांगीनी देशपांडे, डाॅ.जानवी केरझरकर, डाॅ. प्राजक्ता मोरे, तसेच ट्रेनर भक्ती तांदळेकर, परिचर नम्रता मळेकर व प्रफुल्लता गावित आदी अथक परिश्रम घेत असतात. व्यवसाय उपचार थेरपीने रुग्णाची हात डोळे आणि मेंदू यांची सुसूत्रता, आकलन क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. रुग्णांची आवड निवड लक्ष्यात घेऊन त्यांना विविध वस्तू बनवण्याचे शिकवले जात असून, याचा भविष्यात रुग्णांना उपयोग होईल. मनोरुग्ण लवकर बरा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न असतात, अशी माहिती अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600