जिल्हा
डोसा आणि चहासुद्धा 'गॅसवर'
डोसा आणि चहासुद्धा 'गॅसवर'
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे गॅस मिळणे मुश्किल झाल्याने अंबरनाथचे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. बहुतेक हॉटेल मालकांनी चहा, डोसा देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे व्यावसायिकांना लागणारे गॅस सिलेंडर देणे बंद झाल्याने व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे उद्यापासून चहा, मसाला डोसा असे पदार्थ ग्राहकांना देणे बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागणार असल्याचे शहरातील काही हॉटेल आणि टपरी चालकांनी सांगितले.
हॉटेलसाठी लागणारे गॅस सिलेंडर मिळण्यास अडचणी येत आहेत, मिळाले तरी त्याचे दर परवडणारे नाहीत, त्यामुळे कमी फायदा देणाऱ्या चहा, डोसासारख्या पदार्थांना लागणारा गॅसचा वापर टाळण्यासाठी ते पदार्थ देणे बंद करण्यात येणार आहेत.
अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयातील एकमेव असलेल्या चहा कॅन्टीन मालकाने देखील गॅस सिलेंडरचा अभाव असल्याने उद्या दुपारनंतर चहा देणे बंद करावे लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चहाप्रेमींची मोठी पंचायत होणार असल्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600