जिल्हा

अमेरिका-इराण युद्धाची गणेश मूर्तिकारांना झळ

अमेरिका-इराण युद्धाची गणेश मूर्तिकारांना झळ
अमेरिका-इराण युद्धाची गणेश मूर्तिकारांना झळ फोटो: ठाणे वैभव
गणेशमूर्तींच्या पॅकेजिंगसाठी फोम उपलब्ध होईना श्रीकांत खाडे/अंबरनाथ अमेरिका-इराण आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम हॉटेल व्यावसायिक, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांप्रमाणे गणेश मूर्तिकारांनाही बसू लागला आहे. कच्चा माल आणि निर्यात महागल्यामुळे बदलापुरातील युवा उद्योजक गणेश मूर्तिकार निमेश जनवाड यांनाही युद्धाच्या परिणामांची झळ बसली आहे. निमेश जनवाड दरवर्षी त्यांच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून दीड ते दोन लाख गणेशमूर्ती त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य 25 हून अधिक देशांमध्ये पाठवत असतात. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गणेश मूर्ती पॅकिंगसाठी आवश्यक असणारे फोम उपलब्ध होत नसल्याने परदेशात गणेशमूर्ती कशा पाठवायच्या असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असल्याचे जनवाड यांनी खेदाने नमूद केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे निर्यात महागली आहे. मोठ्या संख्येने कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकून पडले आहेत. ग्राहकांपर्यंत माल कधी आणि कसा पोहोचेल, त्याची खात्री देता येत नाही. परदेशातील ग्राहकांनी गणेश मूर्ती तसेच अन्य ऑर्डर नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच बुक केल्या आहेत. मार्च महिन्यापासून लांबचा प्रवास असणाऱ्या मूर्ती पाठवण्यास सुरुवात होते, मात्र कच्च्या मालाची कमतरता, वाढलेली महागाई आणि युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता अशी चौफेर कोंडी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात निर्यात केल्या जातात. पेण येथून मूर्ती बदलापूर येथे आणल्या जातात, नंतर त्यांच्यावर गरजेनुसार कलाकुसरीचे काम करून फोम आणि जाडसर खोक्यातून मूर्ती सुरक्षितपणे रवाना केल्या जातात, त्यासाठी लागणारा फोमचा तुटवडा आहे, दिवसागणिक वस्तूंचे भाववाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांचे हीत लक्षात घेऊन ना नफा ना तोटा या धर्तीवर मूर्ती पाठवण्यास तयार आहोत, पण परिस्थिती बिकट आहे, युद्धजन्य परिस्थिती त्वरित पूर्ववत व्हावी यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी जनवाड यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600