जिल्हा

ठाण्यात दोन दिवसांत ३५० वाहनांवर दंडाचा बडगा

ठाण्यात दोन दिवसांत ३५० वाहनांवर दंडाचा बडगा
ठाण्यात दोन दिवसांत ३५० वाहनांवर दंडाचा बडगा फोटो: ठाणे वैभव
एचएसआरपी नाही, तर कारवाई अटळ ! ठाणे : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य असतानाही नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत एचएसआरपी नसलेल्या 350 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, पुढील काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत परिवहन विभागाने दिले आहेत. ठाणे आरटीओच्या आकडेवारीनुसार, एचएसआरपीसाठी तीन लाख 32,648 वाहनांची नोंदणी झाली असून तीन लाख 31,310 वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेतली आहे. त्यापैकी दोन लाख 57,551 वाहनांवर एचएसआर बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे बहुतांश वाहनधारकांनी नियमांचे पालन केले असताना, काही जणांकडून अद्यापही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार 30 जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांवर कारवाई केली जात नाही. मात्र, नोंदणी किंवा अपॉइंटमेंट न घेणाऱ्या वाहनधारकांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासणी मोहिमेदरम्यान एचएसआरपी नसलेली वाहने आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे. एचएसआरपी ही केवळ औपचारिकता नसून वाहनांची सुरक्षित ओळख, बनावट नंबर प्लेटला आळा आणि गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांनी तातडीने एचएसआरपी बसवून घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600