जिल्हा

हायपर सिटी मॉलमध्ये आगीचा भडका

हायपर सिटी मॉलमध्ये आगीचा भडका
हायपर सिटी मॉलमध्ये आगीचा भडका फोटो: ठाणे वैभव
बुटाच्या कंपनीमधील सामान जाळून खाक ठाणे: घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरातील हायपर सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका नामांकित बूट कंपनीच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील बुट आणि कपडे आदी वस्तू जळाल्या असून त्या दुकानाचे नुकसान झाले आहे. दुकानाच्या बाजूला असलेला गाळा रिकामा असल्याने आग पसरली नाही. ही आग मंगळवारी सकाळी पावणे आठ ते आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. तसेच लागलेली आग एक तासात नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. हायपर सिटी मॉलमधून धूर हळूहळू येताना अचानक मोठ्या प्रमाणात धूर आकाशात पसरला होता. ही बाब लक्षात येताच मुकेश मिश्रा नामक व्यक्तीने तातडीने ती माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. तातडीने कासारवडवली पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी धाव घेत, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तासाभरातच आग विझवण्यात जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. यावेळी, एक रेस्क्यू वाहनासह, दोन फायर आणि दोन हायराईस फायर अशी वाहने पाचारण करण्यात आली होती. आग लागलेला गाळा हा १५२५ चौरस फुटांचा असून त्याच्या शेजारचा गाळा रिकामा असल्याने भीषण आग आजूबाजूला पसरली नाही. मात्र ज्या गाळ्याला आग लागली त्याचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600