जिल्हा
लोकमान्य नगरात उद्धव ठाकरे गटाची पहिली शाखा सुरू
ठाणे: उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या लोकमान्यनगर पाडा क्र. ४ येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन काल शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती
लोकमान्य नगर येथील पाडा क्रमांक चार येथिल शिवसेनेची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली होती, त्यामुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी त्या शाखेच्या बाजूला असलेल्या दोन दुकानात ही शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे रविवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी खा राजन विचारे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी श्री. जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. रामाच्या दर्शनासाठी ते गेले असले तरी त्यांना रामाचा आशीर्वाद मिळणार नाही. शिवसेना ही तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणारी संघटना आहे. सर्वसामान्य नागरिक हे आमच्या सोबत आहेत. त्यांच्याबरोबर नेते गेले आहेत, त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित असल्याचे ते म्हणाले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600