जिल्हा

कडोंमपा क्षेत्रात पाच अर्ध इंग्रजी शाळा सुरु करणार

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची माहिती

कल्याण : महापालिका क्षेत्रात पाच अर्ध इंग्रजी शाळा या वर्षापासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांच्या दालनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेच्या प्रत्येक शाळेसाठी एका अधिकाऱ्यास पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून शाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली जाईल. शाळांमधील आनंददायी वातावरणासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये BALA पद्धतीचे भित्तीचित्रांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच फर्निचर देखील पुरविण्यात येणार आहे. ⁠पाठ्यपुस्तके व वह्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात येतील. त्याचप्रमाणे दप्तर, मोजे, बुट हे देखील देण्यात येणार आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी 'निपूण' अंतर्गत प्रार्थमिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे डिजिटल मॉनिटरिंग 'विनोबा भावे अ‍ॅप'द्वारे करण्यात येणार आहे. संबंधित पालक अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या शाळेला नियमितपणे भेट देऊन प्रगतीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांसोबत आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600