जिल्हा

माजी महापौर अशोक वैती पराभूत

ठाणे : ठाण्यातील धक्कादायक निकाल पुढे आला असून शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव करत ठाकरे गटाचे शहाजी खुस्पे यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक १३ मध्ये ज्ञानेश्वरनगर, रामचंद्र नगर, काजूवाडी, हाजुरीगाव या भागांचा समावेश होत असून येथून पॅनल अ मधून शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती, ब मधून माजी नगरसेविका निर्मला कणसे, क मधून वर्षा शेलार तर ड मधून अनिल भोर रिंगणात होते. याच प्रभागातून ठाकरे गटाने आव्हान दिले होते. त्यात यश आले असून ठाकरे गटाचे शहाजी खुस्पे यांनी अशोक वैती यांचा पराभव केला. खुस्पे यांना १२,८६० मते मिळाली. त्यांनी अशोक वैती यांचा ६२४ मतांनी पराभव केला आहे. पॅनल ड मधील शिंदे गटाचे अनील भोर यांना ११,७४९ मते मिळाली. तर ठाकरे गटाचे संजय दळवी यांना ११,५०३ मते मिळाली. अवघ्या २४६ मतांनी भोर यांना विजय गाठता आला आहे. शिंदे गटाचे पॅनल ब मधून निर्मला कणसे यांना १४,९७६ तर क मध्ये वर्षा शेलार यांना १२,४११ मते मिळून ते विजयी ठरले. प्रभागातील तीन पॅनलवर शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला तरी माजी महापौरांचा पराभव हा शिंदे गटाला धक्का ठरला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600