जिल्हा

सनाया ठक्करची डी.ए.व्ही. नॅशनल स्पोर्ट्स २०२५ मध्ये रौप्य कामगिरी

सनाया ठक्करची डी.ए.व्ही. नॅशनल स्पोर्ट्स २०२५ मध्ये रौप्य कामगिरी
सनाया ठक्करची डी.ए.व्ही. नॅशनल स्पोर्ट्स २०२५ मध्ये रौप्य कामगिरी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडू सनाया ठक्करने नोएडा स्पोर्ट्स स्टेडियम, दिल्ली येथे पार पडलेल्या डी.ए.व्ही. नॅशनल स्पोर्ट्स २०२५ या अत्यंत प्रतिष्ठेच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत वैयक्तिक गटात रौप्य पदक पटकावत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व यशस्वीरीत्या केले. देशभरातील डी.ए.व्ही. शाळांमधील अव्वल खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत सनायाने प्रत्येक फेरीत संयमित आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला. पूर्व उपांत्य फेरीत तिने दिल्लीच्या गुणिका बजाज हिचा १५–१३, १५–९ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेशच्या गुरुबानी हिच्याविरुद्ध १५–४, १५–८ असा विजय मिळवत अंतिम फेरीकडे भक्कम वाटचाल केली. उपांत्य फेरीत हरियाणाच्या मोक्शिता शर्मा हिच्याविरुद्ध सनायाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवत २१–७, २१–१२ असा सहज विजय मिळवला. अंतिम फेरीत तिने शेवटपर्यंत चुरशीची लढत दिली; मात्र कठीण सामन्यानंतर तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सनाया ठक्कर ही ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची उगवती खेळाडू असून, लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तिच्या खेळातील फिटनेस, कोर्टवरील हालचाल, संयम आणि गुणांकन क्षणांतील निर्णयक्षमता विशेष उल्लेखनीय ठरली. या यशामागे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. प्रसेनजीत शिरोडकर, एकेंद्र दर्जी, फुलचंद पासी, अमित गोडबोले, वेदांत जवंजाळ, नरेंद्र वर्मा, सुरेंद्र दिवेकर, संजय कांबळे, नरेश गुंडले, ऋषिकेश जोगळेकर आणि देवांग दलाल यांनी तिच्या तयारीत सातत्याने साथ दिली. या कामगिरीबाबत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड सर म्हणाले, “सनाया ठक्करची ही कामगिरी खूप समाधान देणारी आहे. राष्ट्रीय स्पर्धेत ती शांतपणे आणि आत्मविश्वासाने खेळताना दिसली. योग्य प्रशिक्षण आणि सातत्य राखल्यास ती भविष्यात नक्कीच आणखी चांगली कामगिरी करेल.”

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600