जिल्हा

चार अग्नीशस्त्रे आणि आठ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास अटक

भाईंदर: काशीगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाॅटेल वेस्टर्नमध्ये वास्तव्यास असलेल्या नागपूर च्या इसमाकडे चार गावठी कट्टे व आठ काडतुसे आढळून आल्याने गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी सदर इसमाविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना ६ नोव्हेंबर रोजी माहिती मिळाली की, मिरारोड पूर्व येथील मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वेस्टर्न हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या इसमाकडे विनापरवाना गावठी पिस्तुल आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन सदर ठिकाणी दोन पंचांसह जाऊन शहानिशा केली. हाॅटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या इसमाची कसून चौकशी केली असता त्याचे नांव परमानंद म्हात्रे (२७) व्यवसाय मजुरी, रा. नागपूरच्या ताब्यात चार गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतुस मिळून आले. प्रत्येकी ५० हजाराचे एकूण चार पिस्तूल व आठ हजारांची आठ जिवंत काडतुसे मिळून दोन लाख आठ हजारांचे साहित्य जप्त केले आहे. काशिगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळुन आलेली अग्नीशस्त्रे सदर इसमाने कोठुन आणली व ती कोणास विक्री करणार होता? याबाबत तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600