जिल्हा

शिकलकर टोळीतील चौघे जेरबंद

४० गुन्हे उघडकीस, ४० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत ठाणे: घरफोडी, दरोडा घालणाऱ्या शिकलकर टोळीतील चार जणांच्या ठाणे पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांचेकडून ३९ लाख ५३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व घरफोडी करण्याकरीता वापरण्यात येणारे टोयोटा कपंनीचे इनोवा चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले. या टोळीने ठाणे पोलिस आयुक्तालयात परिसरात केलेले ४० गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे घडले होते, यात सर्वसामान्य जनतेची राहती बंद घरे फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती. या सर्व गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण यांच्याकडून समांतर सुरु करण्यात आला होता, त्यासाठी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध चालु होता. या तपासास गुन्हे शाखा, घटक ३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे. गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यापुर्वी घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर टोळीच्या सदस्यांचे हालचालीवर पाळत ठेवुन घरफोडी चोरी करणारे विजयसिंग शिकलकर (२४) रा. रामटेकडी, हडपसर पुणे, सोनुसिंग जुन्नी (२७) रामटेकडी, हडपसर पुणे, सन्नी करतारसिंग सरदार (२७) रा. आंबिवली, कल्याण, अतुल खंडाळे (खंडागळे) (२४) रा. हडपसर पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयकडील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले एकुण ४० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. घरफोडीचे गुन्हे करण्याकरीता वापरण्यात आलेली एक टोयोटा कपंनीची इनोवा चारचाकी वाहनासह त्यांच्याकडून एकुण ३९ लाख ५३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिहं जाधव यांनी दिली. या टोळीने राज्यातील इतर शहरात देखिल घरफोडी आणि दरोडे टाकले आहेत. या टोळीत अतिशय खतरनाक गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार देखिल विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती उपायुक्त श्री. जाधव यांनी दिली. ही कामगिरी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे अपर पोलिस आयुक्त. पंजाबराव उगले, सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि/सर्जेराव पाटील, सपोनि/बळवंत भराडे, पोउपनि/किरण भिसे, पोउपनि/विनोद पाटील, पोलीस अमलंदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, अदिक जाधव, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, विजय जिरे, विलास कडु, गोरखनाथ पोटे, प्रंशात वानखेडे, उल्हास खंडारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, जालिदंर साळुंखे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांचे पथकाने केलेली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600