जिल्हा

डिझेल दरवाढीचा फटका; एसटीचे तिकीट वाढणार?

डिझेल दरवाढीचा फटका; एसटीचे तिकीट वाढणार?
डिझेल दरवाढीचा फटका; एसटीचे तिकीट वाढणार? फोटो: ठाणे वैभव
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सुमारे १२५ कोटींचा अतिरिक्त भार एसटी महामंडळावर येणार आहे. त्यामुळे आता एसटी बस तिकीट दरातही वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू असताना, मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बैठका घेतल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, काही निर्णय हे कटू असले तरी ते आता घ्यावे लागतील. महागाई अशा पद्धतीने वाढत राहिली, तर महामंडळ जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावेच लागतील. एक लाख कामगारांचा पगार द्यायचा आहे. महामंडळाच्या सुविधाही सुरू राहायला हव्यात. १४,२५० बस रस्त्यावर धावतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. एसटी बस प्रवासात महिलांना जी सूट दिलेली आहे, त्याचे पैसे राज्य शासनाकडून आम्हाला मिळतात. दिव्यांग किंवा समाजातील काही घटकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. ते पैसेही राज्य शासन आम्हाला देत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे, ते पैसे शासन देते. असे असले तरी शेवटी एसटी महामंडळाला सक्षमतेकडे वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अजून किती पैसे घ्यायचे, ज्या ज्या वेळेस गरज पडते, तेव्हा आम्ही शासनाकडे पैसे मागतो. नवीन बस घ्यायच्या असतील, तर शासनाकडे पैसे मागतो. प्रत्येक गोष्टीसाठी शासन पैसे देते. एसटी स्टँड बांधणे, दुरुस्ती/सुधारणा करणे यासाठी पैसे आम्ही शासनाकडून घेतो. इतर सोयी-सुविधांसाठी शासन आम्हाला पैसे देते, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या सगळ्या बस इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. आता आम्ही आठ हजार बस डिझेल घेतलेल्या आहेत. परंतु, भविष्यात इलेक्ट्रिक बस विकत घेण्यावरच भर राहणार आहे. सगळ्या इलेक्ट्रिक बस घेतल्या तरी त्याला चार्जिंग स्टेशन लागणार आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया करत आहोत, असेही सरनाईक म्हणाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600