जिल्हा
उपवन येथे लागलेल्या आगीत घराचे नुकसान
उपवन येथे लागलेल्या आगीत घराचे नुकसान
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: उपवन येथील सूर्या सोसायटीच्या आठव्या मजल्यावर लागलेल्या आगीत घरातील लाकडी मंदिर, वॉटर प्युरीफायर, प्लास्टिक टेबल, किचन रूममधील भांडी व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
ही घटना सोमवारी सकाळी ११च्या सुमारास समोर आली. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळविले. घरातील असलेल्या लाकडी मंदिरात लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागली असावी तसेच आग लागली तेव्हा घरात कोणी नव्हते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
आग लागलेली खोली व्यंकटेशाचलम यांच्या मालकीची असून तेथे अक्षय शिंदे नामक भाडोत्री म्हणून सद्यस्थितीत राहत आहेत. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घरात असलेल्या लाकडी मंदिरात दिवा लावला होता. त्यानंतर ते कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले होते. याचदरम्यान घरात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. तातडीने त्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. मात्र आगीच्या घटनेत त्या घराचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600