जिल्हा

मीरा-भाईंदरमध्ये करवाढीविरोधात शेकडो बार, हॉटेल बंद

मीरा-भाईंदरमध्ये करवाढीविरोधात शेकडो बार, हॉटेल बंद
मीरा-भाईंदरमध्ये करवाढीविरोधात शेकडो बार, हॉटेल बंद फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलै रोजी घोषित केलेल्या राज्यव्यापी बंदला (ड्राय डे) काशिमीरा हॉस्पिटॅलिटी अँड एंटरटेनमेंट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४२ ऑर्केस्ट्रा बार असून ३५० बार अँड रेस्टॉरंट बंद असल्याचे असोशिएशनच्या सूत्रांनी सांगितले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या उद्योगाचे कंबरडे मोडत आहे. आम्ही वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहोत. शासन कर, परवाना शुल्क आणि नियामक शुल्कात झालेल्या बेलगाम वाढीमुळे आमचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आमचे आंदोलन कोणत्याही राजकारणाने प्रेरित नाही, तर ते आमच्या उपजीविकेचे साधनाचे रक्षण करण्यासाठी असून कर्मचाऱ्यांचे भविष्य आणि हॉटेल व्यवसायाशी संबंधित संपूर्ण पुरवठा साखळीचे रक्षण करण्यासाठी आहे. सरकारने यावर ठोस उपाय शोधला पाहिजे, असे सरचिटणीस उदय शेट्टी यांनी सांगितले. आम्ही पर्यटनाला प्रोत्साहन देतो आणि हजारो लोकांना रोजगार देतो, तरीही नवीन कर धोरणांमुळे आमचे नुकसान होणार असून हातभट्टी मालकांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे, अशी भीती कोषाध्यक्ष सचिन डांगे यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600