जिल्हा

दिव्यात उघड्यावर भरते तळीरामांची जत्रा

दिव्यात उघड्यावर भरते तळीरामांची जत्रा
दिव्यात उघड्यावर भरते तळीरामांची जत्रा फोटो: ठाणे वैभव
दारूची दुकाने आणि मद्यपींना आवरा; शैलेश पाटील यांचा आंदोलनाचा इशारा ठाणे: दिवा परिसरातील दारू दुकानांबाहेर तळीराम सर्रासपणे दारू पित असतात, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना आणि मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी मुंब्रा पोलिसांना निवेदन देऊन उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दिव्यात दारू दुकानांसमोरच दारू पिणाऱ्यांची मोठी गर्दी असते आणि दुकानदार स्वतःच दारू पिण्यासाठी लागणारे पाणी, सोडा, चिप्स, फरसाण यांसारखे खाद्यपदार्थ विकून या गैरप्रकाराला प्रोत्साहन देत आहेत. दिवा शहरात मुख्य ठिकाण असणाऱ्या दिवा टर्निंग येथे दारुड्यांची गर्दी असते. येथे उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार होतात. यावर वेळीच कारवाई करावी अशी मागणी शैलेश पाटील यांनी केली आहे. नागरिकांच्या आक्षेपानंतरही अनेक दारू दुकानदार बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिवा परिसरात अनेक अवैध दारू दुकाने उघडपणे सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पाटील यांनी विशेषत्वाने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित केला. सर्वसामान्य कुटुंबातील महिला या परिसरातून जात असताना त्यांना या तळीरामांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. "एखादी दुर्दैवी घटना घडल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत का?" असा संतप्त सवाल त्यांनी निवेदनातून विचारला असून, पोलिसांनी तत्काळ पावले उचलणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600