जिल्हा

भाईंदरमध्ये राई गावात बिबट्याचा संचार!

भाईंदरमध्ये राई गावात बिबट्याचा संचार!
भाईंदरमध्ये राई गावात बिबट्याचा संचार! फोटो: ठाणे वैभव
भाईंदर: भाईंदरमध्ये अवघ्या पाच महिन्यांपूर्वी बिबट्याने रहिवासी वस्तीत प्रवेश करुन तिघा जणांना जखमी केल्याची घटना चर्चेत असतानाच भाईंदर पश्चिमेकडील राई गावालगत असलेल्या मोकळ्या मैदानी भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भाईंदर पश्चिम परिसरात खाडीकिनारी मोठा मोकळा भाग आहे. येथे काही मोजकी जुनी गावे असून, वाढत्या शहरीकरणामुळे बहुतांश ठिकाणी गृहसंकुले उभारण्यात आली आहेत. दरम्यान, राई गावाजवळ एक बिबट्या मुक्तपणे वावरत असल्याचे समोर आले आहे. याच परिसरात राहणाऱ्या नेहा जाधव यांनी मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केल्याचा दावा समाजमाध्यमांवर केला आहे. हा बिबट्या कमी वयाचा दिसत असून, तो परिसरात फिरताना आढळला आहे. त्यामुळे तो नेमका कुठे जाईल या संदर्भात स्थानिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला तसेच वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने परिसरात कॅमेरे बसवून बिबट्याचा शोध सुरू केला आहे. अद्याप बिबट्याने कुणावर हल्ला केल्याची किंवा कोणत्याही पाळीव प्राण्याची शिकार केल्याची घटना समोर आलेली नाही. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्याच्या दृष्टीने वनविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच भाईंदरमधील एका नागरी वस्तीत बिबट्याने धुमाकूळ घालत घरात घुसून तिघांना जखमी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता पुन्हा शहरात बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600