ठाणे: या वर्षीच्या कारगिल विजय दिनानिमित्त, सरस्वतीच्या छात्र सेनेच्या कॅडेट यांनी युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकी अधिकारी आणि सैनिकांना भावपूर्ण मानवंदना दिली.
या प्रसंगी 'कुरुक्षेत्र ते कारगिल' या पुस्तकाच्या लेखिका नयना वैद्य या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी काही कॅडेट यांनी या लढाईतील काही थरारक प्रसंग कथित केले. प्रमुख पाहुण्या नयना वैद्य यांनी भारतीय सेनेने देश स्वतंत्र झाल्यावर लढलेल्या विविध लढाईच्या गोष्टी सांगून आढावा घेतला.
संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी छात्र सेनेला मार्गदर्शन करताना वर्तमान काळ आणि भविष्यात होणाऱ्या युद्धाचे बदलते स्वरूप समजावून सांगितले. शौर्य आणि तंत्रज्ञान कौशल्य याचा मिलाप पुढील काळात जास्त होणार असून त्यासाठी भावी पिढीने सजग आणि सक्षम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.