जिल्हा

आवक वाढल्याने पालेभाज्या झाल्या स्वस्त

आवक वाढल्याने पालेभाज्या झाल्या स्वस्त
आवक वाढल्याने पालेभाज्या झाल्या स्वस्त फोटो: ठाणे वैभव
कोथिंबिरीची जुडी ५० ते ६० रुपयांवरून थेट १० रुपयांवर नवी मुंबई : महिनाभरापूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचविणाऱ्या पालेभाज्यांचे दर आता मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. विशेषतः कोथिंबिरीची जुडी मागील आठवड्यात ५० ते ६० रुपयांना विकली जात होती, ती सोमवारी वाशीतील एपीएमसी भाजीपाला बाजारात अवघ्या १० रुपयांना उपलब्ध झाली. पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने हा दिलासादायक बदल झाला असला, तरी ग्राहक देखील पावसामुळे कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी व व्यापारी मात्र आर्थिक संकटात सापडले असल्याचे व्यापारी इस्माईल शेख यांनी सांगितले. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू यांसारख्या पालेभाज्यांचे उत्पादन घटले होते. त्यामुळे बाजारातील आवक कमी होऊन दर गगनाला भिडले होते. मात्र, तीन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले असून एपीएमसी बाजारात नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात माल दाखल होत आहे. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक सुमारे ६० ते७० टक्क्यांनी वाढली आहे. पालेभाज्या अतिशय नाशवंत असल्याने त्यांची तातडीने विक्री करावी लागते. वाढलेली आवक आणि ग्राहकांकडून तुलनेने कमी मागणी यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबिरीप्रमाणेच मेथी, शेपू आणि पालक यांच्या दरातही मोठी घट झाली आहे. महिनाभरापूर्वी ४० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाणारी मेथी आता ८ ते १० रुपयांना मिळत आहे. शेपूची,पालक, कांदापात जुडी ३० ते ४० रुपयांवरून १० रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे गृहिणींना आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र किरकोळ बाजारात मात्र दर चढेच आहेत. मात्र, दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढलेला उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरी यांचा विचार करता सध्याच्या दरात खर्चही भरून निघत नसल्याची खंत अनेक उत्पादकांनी व्यक्त केली. त्यामुळे ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब असली, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र तोट्याचा व्यवहार ठरत आहे. दुसरीकडे पालेभाज्यांचे दर कमी झाले असले, तरी टोमॅटो, भेंडी, गवार, वांगी यांसारख्या फळभाज्यांचे दर अद्यापही चढेच असल्याने ग्राहकांचे संपूर्ण बजेट अद्याप संतुलित झालेले नाही. पालेभाज्यांचे दर (रुपयांत प्रति जुडी) भाजी महिनाभरापूर्वी सध्याचे दर कोथिंबीर ५० ते ५० १० रु. मेथी ४० ते ५० ८ ते १० शेपू ३० ते ४० १० पालक २० ते ३० आता १०

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600