जिल्हा
शरद पवार गटाच्या ठाणे शहर महिलाध्यक्षपदी मनिषा भगत
शरद पवार गटाच्या ठाणे शहर महिलाध्यक्षपदी मनिषा भगत
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नगरसेविका मनिषा भगत यांची तर कार्याध्यक्षपदी साबिया मेमन आणि फुलबानो पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजाता घाग यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्षपदी मनिषा भगत, कार्याध्यक्षपदी साबिया मेमन व फुलबानो पटेल यांची नियुक्ती केली आहे.
मनिषा भगत यांची आक्रमक चेहरा अशी ओळख आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. तर साबिया मेमन आणि फुलबानो पटेल या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असून पक्षाच्या विविध आंदोलन, उपक्रमांमध्ये त्या हिरीरीने सहभागी होत असतात.
मनिषा भगत, साबिया मेमन आणि फुलबानो पटेल यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची ताकद अधिकच वाढणार असून महिला विंग अधिक सक्षम होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600