जिल्हा

आसनगावच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार चंद्रावर!

आसनगावच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार चंद्रावर!
आसनगावच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार चंद्रावर! फोटो: ठाणे वैभव
नासाच्या 'आर्टेमिस' मोहिमेत सहभाग शहापूर: जागतिक अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'आर्टेमिस' मोहिमेत तालुक्यातील आसनगाव येथील एन.जे.बेलवले पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपली मोहर उमटवली असून नासाच्या या मोहिमेद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांची नावे एका मायक्रोचिपद्वारे प्रत्यक्ष चंद्राच्या कक्षेत पाठवली जाणार असल्याची माहिती विद्यालय प्रशासनाने दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी आणि खगोलशास्त्राबद्दल कुतूहल निर्माण व्हावे यासाठी शाळेने नासाच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या नावांची नोंदणी नासाच्या अधिकृत पोर्टलवर करण्यात आली असून, त्यांना नासाकडून अधिकृत 'बोर्डिंग पासेस' देखील मिळाले आहेत. नासाच्या 'आर्टेमिस' मोहिमेअंतर्गत 'ओरायन' हे अंतराळयान चंद्राला प्रदक्षिणा घालणार आहे. याच यानामध्ये एक विशेष फ्लॅश ड्राईव्ह असेल, ज्यावर या विद्यार्थ्यांची नावे साठवलेली असतील. आसनगावसारख्या ग्रामीण भागातील शाळेचे नाव जागतिक पातळीवर पोहोचल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळावे यासाठी एन.जे.बेलवले पब्लिक स्कूल नेहमीच अग्रेसर असते. मंगळवारी शाळेत या बोर्डिंग पासेसचे वितरण करण्यात आले, तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास पाहायला मिळाला. भविष्यात हेच विद्यार्थी अंतराळवीर बनून देशाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास शिक्षकांनी 'ठाणेवैभव'शी बोलतांना व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला आणि कल्पकतेला आकाशाची मर्यादा नसावी, हाच आमचा उद्देश आहे. नासाच्या मोहिमेत आमचे नाव जोडले जाणे, ही शाळेसाठी आणि संपूर्ण शहापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना या बालवयातच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, अंतराळवीर आणि गुरुत्वाकर्षण विरहित जीवन याबद्दल माहिती मिळावी, म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला. मुलांच्या डोळ्यांत आज एक नवी चमक दिसत आहे, अशा भावना विज्ञान विभाग प्रमुखांनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600