जिल्हा

रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

ठाणे: मध्य रेल्वेचा मुंबई विभाग, २७ ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक परिचालीत करणार आहे. ब्लॉक सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणा-या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुटणा-या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणा-या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणा-या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600