जिल्हा
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना पत्र लिहून केले मतदानाचे आवाहन
भाईंदर: मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकामार्फत आज शुक्रवारी मतदार जनजागृती अंतर्गत मिरे गाव मनपा शाळा क्रमांक 20 मधील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याचे आवाहन केले.
आमच्या उज्वल भविष्यासाठी सुजाण नागरिक या नात्याने मतदान करणे माझ्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे असा संदेश या मुलांनी पत्रात दिला आहे. तसेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी या पत्राद्वारे आई-वडिलांना केले. विद्यार्थी, शिक्षक आणि स्वीप पथकामार्फत मिरेगाव येथील मतदारांना गुलाब पुष्प देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600