जिल्हा

मेट्रो-रस्ते प्रकल्पांना गती; ४,८९७ कोटींची तरतूद

खा. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण लोकसभेच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तब्बल ४,८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो-५, आणि मेट्रो-५ अ विस्तारीकरण, मेट्रो १२, मेट्रो १४, कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे (टप्पा-३) या प्रकल्पांचा समावेश आहे. या भरीव निधीच्या तरतुदीसाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि एमएमआरडीए प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, नियोजनबद्ध पाठपुरावा बैठका आणि राज्य सरकार व एमएमआरडीएशी केलेल्या समन्वयामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांत कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढता वाहतूक ताण लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज होती. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पांची आखणी करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये मेट्रो मार्गिकांचा विस्तार याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. एमएमआरडीएने तरतूद केलेल्या या निधीतून मेट्रो जाळ्याचा विस्तार हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मेट्रो-५ तसेच मेट्रो-५अ विस्तारीकरण, मेट्रो-१२ आणि मेट्रो-१४ या महत्त्वाकांक्षी मार्गांच्या कामांना गती दिली जाणार आहे. या मेट्रो प्रकल्पांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ थेट महानगरातील प्रमुख व्यावसायिक व निवासी पट्ट्यांशी जोडला जाणार असून, रोजच्या प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणालीला बळ मिळणार आहे. यासोबतच रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांनाही मोठी चालना मिळणार आहे. कल्याण-शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३ ) या प्रकल्पांचा समावेश असून, या मार्गांमुळे शहरांतर्गत आणि आंतरशहरी वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच औद्योगिक आणि लॉजिस्टिक वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600