महाराष्ट्र

आमदार रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ

ईडीने समन्स पाठवले; मंगळवारी होणार चौकशी मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वायकर यांना ईडीने समन्स पाठवले आहे. मंगळवारी जोगेश्वरी भूखंड प्रकरणी चौकशी होणार आहे. काही दिवसापूर्वी ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. तर काही दिवसापूर्वी चौकशीसाठी ईडीने समन्स दिले होते, पण ते त्यावेळी चौकशीसाठी गेले नव्हते आता दुसऱ्यांदा ईडीने नोटीस पाठवली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रखरणी होणार आहे, तर बुधवारी बारामती अँग्रो प्रकरणी बुघवारी ईडी चौकशी करणार असून गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १७ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र, वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. याउलट चौकशीस हजर राहण्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना मुदतवाढ दिली किंवा कसे याची माहिती ईडीकडून प्राप्त झाली नाही. या प्रकरणी अलीकडेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण सात ठिकाणी छापेमारी केली होती.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600