महाराष्ट्र
जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई : राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झाले आहेत."जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणेच काम सुरू असून त्यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, असे आवाहन सीएम शिंदे यांनी केले आहे.
"मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरू आहे. त्यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सरकार राज्यभरात कुणबी नोंदी शोधत आहेत, त्या मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मागासवर्ग आयोग काम करत आहे, समाजाला याचा फायदा होत आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीचे लोक राज्यात काम करत आहेत. दीड लाख लोक तीन पाळ्यांमध्ये काम करत आहेत. राज्य सरकार फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देईल, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी राज्यातील करोडो मराठा रस्त्यावर येतील, २५ जानेवारीला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. मला मुंबईत काही झाले तर वर्षानुवर्ष हे आंदोलन सुरू होईल. सरकारमधील चार-पाच मंत्री आमच्याविरोधात ट्रॅप लावत आहेत. त्यांनी काही केले तर लगेच मी नाव जाहीर करणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
"अंतरवाली सराटीसारखी चूक त्यांनी करु नये. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. त्यांना पश्चाताप करायला वेळ मिळणार नाही. त्यांनी आरक्षणात तोडगा काढण्याचे काम करायला पाहिजे. आता पूर्वीचा मराठा राहिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही त्यांना वेळ दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे त्यांनी लक्ष घालून आरक्षण द्या. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. बाकीचे प्रयत्न करायला गेलात तर त्याचे परिणाम वाईट होणार होतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600