जिल्हा

गर्भवती मृत्यू प्रकरणी आयुक्तांना मनसे, शरद पवार गटाचा घेराव

गर्भवती मृत्यू प्रकरणी आयुक्तांना मनसे, शरद पवार गटाचा घेराव
गर्भवती मृत्यू प्रकरणी आयुक्तांना मनसे, शरद पवार गटाचा घेराव फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: सोनम डोंगरे या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर चुकीचे उपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याचे पडसाद गुरुवारी नवी मुंबईत उमटले असून दोषींवर कारवाई करावी म्हणून मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडत जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी आयुक्तांनी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांचे निलंबन केले आहे. ३० जून रोजी ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. या दोन्ही महिला आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने त्यांचा गर्भधारणेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच प्रिमॅच्युअर प्रसूती होऊन त्यांच्या अर्भकाच्या प्रकृतीमध्ये दोष राहू नये याकरिता सर्वसाधारणपणे अशा गर्भवती महिलांना देण्यात येणारे इंजेक्शन त्यांना देण्यात आले होते. तथापि त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वाशी येथील नमुंमपा सार्वजनिक रूग्णालयात १ जुलै २०२६ रोजी हलविण्यात आले. यामधील सोनम डोंगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तसेच रिचा मिश्रा यांना यांना फोर्टीज रूग्णालयात पुढील उपचारखातर भरती केले आहे. मात्र सोनम डोंगरे यांचा मृत्यू हा चुकीचे इंजेक्शन दिल्याने व उपचारात हलगर्जीपणा केल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. याची तत्काळ दखल घेत सोनम डोंगरे यांना दिलेले इंजेक्शनचे सर्व रूग्णालयांमध्ये डोस तत्काळ थांबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिले. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमलेली असून त्यामध्ये जेजे रूग्णालयाचे विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ सोसायटीचे सदस्य आणि नमुंमपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे सदस्य असणार आहेत. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून या समितीस सत्वर सविस्तर अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र सदर घटनेत हलगर्जी पणा झाल्याचा आरोप करत मनपा वैद्यकीय ढिसाळ कारभार विरोधात मनसे व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनात जोरदार आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600