महाराष्ट्र

एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला खासदारांचा पाठिंबा

एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला खासदारांचा पाठिंबा
एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला खासदारांचा पाठिंबा फोटो: ठाणे वैभव
खा. म्हस्के यांनी दिल्या डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना शुभेच्छा मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. या निवडणुकी संदर्भात आज गुरुवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र आणि गोवा येथील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली. महाराष्ट्रातील एनडीएच्या सर्व खासदारांनी उपराष्ट्रपती म्हणून डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना निवडून देण्याचा यावेळी निश्चय केला. या बैठकीस मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले, शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपाचे महामंत्री विनोद तावडे आणि मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमवेत महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांनी संबोधित केले. महाराष्ट्र आणि गोव्यातील एनडीएचे सर्व खासदार यांनी देशाचे हीत लक्षात घेऊन ठामपणे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डॉ. सी. पी. राधाकृष्ण यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी डॉ. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600