जिल्हा

मुंबई महापालिकेची पाणीकपात, ठाण्याला झळ

ठाणे: मुंबई महापालिकेच्या पिसे, पांजरापूर येथील विद्युत केद्रात वीज मीटर्स अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कोट्यातून ठाण्याला देण्यात पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी, ८५ एमएलडी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. या पाणी साठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो. याच भागात मंगळवार ७ ते गुरुवार ९ ऑक्टोबर या काळात १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600