जिल्हा

मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष का?

मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष का?
मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष का? फोटो: ठाणे वैभव
राष्ट्रवादी (श.प.) ने केला प्रशासनाचा निषेध ठाणे: मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल आला असून या अहवालानुसार वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या अपघातास रेल्वेचे अधिकारी कारणीभूत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी (श.प.) च्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निषेध नोंदविला. तसेच, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळेस रेल्वे पोलीस दलाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांची भेट घेऊन पोलिसांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मनोज प्रधान म्हणाले, या अपघाताचा तपास करणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वेचे अधिकारी सहकार्य तर करीत नव्हतेच; शिवाय, बॅगमुळे अपघात झाल्याचे कारण पुढे करून तपास भरकटविण्याची दक्षता घेत होते. मात्र, पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पाच जणांचे जीव गेल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार नाही तर महाप्रबंधकांवरही कारवाई केली पाहिजे; तसेच, गोरगरीब प्रवाशांना दोष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाचे प्रमुख असलेल्या अश्विनी वैष्णव यांनी माफी मागितलीच पाहिजे. दरम्यान, या अपघातानंतर सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांचे अर्थसाहाय्य जाहीर केले होते. ते अद्याप देण्यात आलेले नाही. ही असंवेदनशीलता सहन करण्यासारखी नाही. सरकारने आपले आश्वासन तत्काळ पाळावे, अशी मागणीही प्रधान यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली. याप्रसंगी, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष राजेश सुरेश कदम, ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600