जिल्हा

सेनेच्या परांजपेंना महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध

सेनेच्या परांजपेंना महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध
सेनेच्या परांजपेंना महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध फोटो: ठाणे वैभव
शिवसेनेच्या भूमिकेवर ठरणार भवितव्य ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला राम राम करून मागिल महिन्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतलेले माजी खासदार आनंद परांजपे यांना शिवसेनेने महामंडळाचे अध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेकडे केली असल्याने श्री. परांजपे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आनंद परांजपे यांनी 2012 मध्ये शिवसेनेला राम राम करताना एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढवून घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही नाराजी दूर केली. त्यामुळेच त्यांच्या पक्ष प्रवेशाला शिंदेंनी हिरवा कंदील दाखविल्याने खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आनंद परांजपे यांनी मागिल महिन्यात शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत माझी कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे सांगितले. कुठल्या अपेक्षेने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले नाही. संघटनेने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कुठल्याही पदाच्या अपेक्षेने मी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम, आणि माझा डीएनए हा शिवसेनेचाच आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत काम करेन. पक्षसंघटनेत मला काम करायचे आहे, पक्षसंघटनेत मला जे काम दिले जाईल ते मी जोमाने पार पाडेन, आज मी स्वगृही आलोय, असे आनंद परांजपे यांनी शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यावेळी परांजपे यांना महामंडळ मिळणार अशी जोरदार चर्चाही सुरू झाली होती. दरम्यान राष्ट्रवादीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पक्ष सोडून मित्र पक्षात प्रवेश घेतलेल्या परांजपे यांना म्हाडा कोकण विभागाचे उपाध्यक्ष पद देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याबाबत विनंती करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पत्र देऊन राष्ट्रवादीने परांजपे यांना कोकण म्हाडा मंडळाचे उपाध्यक्षपद देण्यास विरोध केला आहे, त्यामुळे परांजपे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600