जिल्हा

आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सॲप हॅक

आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सॲप हॅक
आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सॲप हॅक फोटो: ठाणे वैभव
बदलापूर : आमदार किसन कथोरे यांचा व्हॉट्सॲप क्रमांक हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित हॅकरकडून अनेक नागरिकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ५० हजार ते ५५ हजार रुपयांची मागणी करणारे मेसेज विविध व्यक्तींना करण्यात येत असल्याची माहिती आमदार कथोरे यांनी दिली. आमदार कथोरे यांच्या मोबाईलमध्ये हजारो नागरिकांचे संपर्क क्रमांक असल्यामुळे अनेक बदलापूरकर आणि इतर नागरिकांना संशयास्पद संदेश येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अनोळखी किंवा संशयास्पद नंबरवरून पैसे मागणारे मेसेज, लिंक किंवा कॉल आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी खातरजमा करावी,” असे आवाहन आमदार कथोरे यांनी केले आहे. तसेच या प्रकाराबाबत सायबर सेल आणि पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहून तातडीने जवळच्या पोलिस ठाणे किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600