जिल्हा

खारघरमध्ये एनएमएमटी बसने घेतला पेट

नवी मुंबई : खारघर रेल्वेस्थानक ते वसाहत या मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेच्या (एनएमएमटी) बसला बुधवारी दुपारी वसाहतीमधील सेक्टर १५ येथील रस्त्यावर अचानक आग लागल्याची घटना घडली. एनएमएमटीच्या बसचालकाला पावणेबारा वाजता इंजीनमधून धूर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने बस रस्त्याशेजारी लावून पहिल्यांदा प्रवाशांना बसमधून उतरवले. काही मिनिटांत बसमध्ये आगीने पेट घेतला. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तोवर बस आगीत जळून खाक झाली होती. घरकुल आणि स्पॅगेटी या सिडको मंडळाने बांधलेल्या वसाहतींमधील रहिवासी याच रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे ये-जा करतात. आग लागताच बसमधील प्रवासी, वाहक, चालक खाली उतरल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी सुद्धा तळोजा येथे प्रवासी बसला आग लागली होती. एनएमएमटीच्या बस जुन्या झाल्याने अनेक बस नादुरुस्त असून त्या रस्त्यावर धावत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600