जिल्हा

महासभेत नगरसेवकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून उत्तरेच नाहीत

महासभेत नगरसेवकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून उत्तरेच नाहीत
महासभेत नगरसेवकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून उत्तरेच नाहीत फोटो: ठाणे वैभव
प्रशासनाला सर्वपक्षीय सदस्यांनी धारेवर धरले ठाणे : महासभेत नगरसेवकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांनाच प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आयुक्त सौरव राव यांची भर महासभेतच कानउघाडणी केली. प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, प्रशासनाकडून देण्यात आलेले उत्तर अपुरे आणि गोलमोल असल्याने भगत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनीही समाधानकारक माहिती न दिल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महापौरांनी हस्तक्षेप करत संबंधित विषयावर मंगळवारी महापौर दालनात बैठक घेण्याचे निर्देश दिले. मात्र, नगरसेवकांनी हा तोडगा फेटाळत "जनतेचे प्रश्न महासभेत विचारले जातात, त्यांची उत्तरेही महासभेतच मिळाली पाहिजेत," अशी ठाम भूमिका घेतली. सभागृहनेते हणमंत जगदाळे यांनीही प्रशासनाला धारेवर धरत, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महापालिका सचिव मनीष जोशी यांनी पुढील महासभेत पूरक प्रश्न विचारता येईल, असे उत्तर दिले. मात्र, या उत्तरानेही सदस्यांचे समाधान झाले नाही. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधला. "एका महासभेत २५ ते ३० प्रश्न घेतले जातात, पण अधिकाऱ्यांना त्यांची उत्तरेच देता येत नाहीत. मग अशा प्रश्नोत्तराचा उपयोग काय? गरज पडल्यास प्रश्नांसाठी स्वतंत्र महासभाच घ्या," अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला सर्वपक्षीय सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिल्याने प्रशासनाची कोंडी झाली. सभागृहातील वाढता रोष पाहता महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत फटकारले. "नगरसेवकांना कामकाजाचे प्रशिक्षण देता, मग अधिकाऱ्यांनाही प्रश्नांची अचूक, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे कशी द्यायची याचे प्रशिक्षण द्या. अन्यथा महासभेतील प्रश्नोत्तराचा अर्थच उरत नाही," अशी तंबी त्यांनी आयुक्तांना दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600